झुक दर्गा

पुण्यात यासीन झुक दर्गा नावाचा एक दर्गा आहे

त्याची गोष्ट अशी आहे की पहीले बाजीराव पेशवे जेव्हा येथील रस्त्यावरून जाणार होते, त्या परिसरात यासीन नावाचा एक मनुष्य राहत होता हा फकीर असल्यामुळे हा देवाच्या साधनेकरीता उंच झाडावर जाऊन बसायचा. बाजीराव पेशवे जाणार असल्यामुळे सर्व सैनिकांनी लोकांना ऊंचावरील खिडक्या दारे बंद कराव्या व बाजीराव पेशवे हे हत्तीवर बसून जाणार असल्यामुळे त्यापेक्षा उंच कोणीही खिडकीतून डोकावून नये किंवा झाडावर बसू नये म्हणून पाहणी करीत होते.

सैनिकांनी या फकीराला उंच झाडावर बसलेले पाहिले व त्याला खाली उतरायची विनंती करू लागले

पण फकीर काही केल्या ऐकायला तयार होईना.
असा बराच वेळ गेला. बाजीरावांची स्वारी हत्तीवरून तेथे आली. शेवटी सैनिक झाडावर चढून फकीराला खाली आणायचा प्रयत्न करु लागले.

या सर्व प्रकारामुळे फकीर चिडला व त्याने हत्तीच्या तिच्या दिशेने हात करून जोराने “ झुक” असा आदेश दिला.

हे ऐकताच हत्ती जागेवरच खाली बसला व उठायला तयार होईना. होत असलेला सर्व प्रकार थोरल्या बाजीरावांच्या लक्षात आला. ते लगेच हत्तीवरून खाली उतरले आणि झाडाच्या खाली जाऊन उभे राहून फकिराला नमस्कार केला व त्याला खाली येण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन फकीर झाडावरून खाली आला.
नंतर पहिल्या बाजीरावांनी काही जमीन ईनाम म्हणुन त्या दर्ग्याच्या नावे केली.
तेव्हापासून त्या दर्जाचे नाव यासीन झुक दर्गा असे प्रचलित झाले.

अशी एक कथा प्रचलित आहे


मुकुंदनगर वरून पुणे कँटोनमेंट च्या दिशेने जाताना गूल पूनावला उद्यानाच्या समोर हा दर्गा आहे

Author : Chnadrashekhar Gokhale
Twitter: https://twitter.com/ShekharGokhale
Facebook: https://www.facebook.com/ShekharMGokhale

Comments

Popular posts from this blog

डेंगळे पूल