Posts

झुक दर्गा

पुण्यात यासीन झुक दर्गा नावाचा एक दर्गा आहे त्याची गोष्ट अशी आहे की पहीले बाजीराव पेशवे जेव्हा येथील रस्त्यावरून जाणार होते, त्या परिसरात यासीन नावाचा एक मनुष्य राहत होता हा फकीर असल्यामुळे हा देवाच्या साधनेकरीता उंच झाडावर जाऊन बसायचा. बाजीराव पेशवे जाणार असल्यामुळे सर्व सैनिकांनी लोकांना ऊंचावरील खिडक्या दारे बंद कराव्या व बाजीराव पेशवे हे हत्तीवर बसून जाणार असल्यामुळे त्यापेक्षा उंच कोणीही खिडकीतून डोकावून नये किंवा झाडावर बसू नये म्हणून पाहणी करीत होते. सैनिकांनी या फकीराला उंच झाडावर बसलेले पाहिले व त्याला खाली उतरायची विनंती करू लागले पण फकीर काही केल्या ऐकायला तयार होईना. असा बराच वेळ गेला. बाजीरावांची स्वारी हत्तीवरून तेथे आली. शेवटी सैनिक झाडावर चढून फकीराला खाली आणायचा प्रयत्न करु लागले. या सर्व प्रकारामुळे फकीर चिडला व त्याने हत्तीच्या तिच्या दिशेने हात करून जोराने “ झुक” असा आदेश दिला. हे ऐकताच हत्ती जागेवरच खाली बसला व उठायला तयार होईना. होत असलेला सर्व प्रकार थोरल्या बाजीरावांच्या लक्षात आला. ते लगेच हत्तीवरून खाली उतरले आणि झाडाच्या खाली जाऊन उभे राह...

डेंगळे पूल

पुण्यात शनिवार वाड्या कडून आरटीओ ऑफिस कडे जाताना मधल्या भागात डेंगळे पूल नावाचा एक पूल आहे हा पूल त्र्यंबकजी डेंगळे यांच्या नावाने आहे डेंगळे हे बाजीराव दुसरा च्या सैन्यात सेनापती होते व इंग्रजाविरुद्ध झालेल्या कोरेगाव भीमा लढाईत नेतृत्व करीत होते कालांतराने लढाई हरल्यानंतर व इंग्रजांनी वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर दुसऱ्या बाजीरावाकडे त्र्यंबकजी डेंगळे यांना त्यांच्या हवाली करण्यासाठी आदेश दिले. बाजीराव ते आदेश मानायला तयार नव्हता. परंतु त्रिंबकजी डेंगळे यांनी बाजीरावाला विनंती केली की एका व्यक्ती करिता संपूर्ण स्वराज्याचे नुकसान करून घेण्यात मतलब नाही व स्वतःहून इंग्रजांच्या हवाली झाले. ते ठिकाण या पुलावरून आरटीओकडे जाताना डाव्या बाजूला जो भाग नदीपात्रात बंगला आहे तेथे आहे. त्याच ठिकाणी नंतर इंग्रजांनी त्र्यंबकजी डेंगळे यांची हत्या केली. Author : Chnadrashekhar Gokhale Twitter: https://twitter.com/ShekharGokhale Facebook: https://www.facebook.com/ShekharMGokhale